मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024: संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेस मंजुरी दिली. या योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला रु. १,५००/- आर्थिक मदत थेट बँक खात्यात (DBT) जमा केली जाणार आहे.
योजनेचे स्वरूप (Format of Scheme):
- प्रत्येक पात्र महिलेला तिच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट हस्तांतरण (DBT) पद्धतीने दर महिन्याला रु. १,५००/- जमा केले जाईल.
पात्रता (Eligibility):
१. लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
२. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार महिला किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र ठरेल.
३. किमान वय २१ वर्षे पूर्ण असावे आणि कमाल वय ६५ वर्षे असावे.
४. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
अपात्रता (Ineligibility):
१. ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त आहे.
२. कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास.
३. कुटुंबातील सदस्य राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून कार्यरत असल्यास, किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असल्यास.
४. लाभार्थी महिला अन्य शासकीय आर्थिक योजनांचा दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेत असल्यास.
५. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असल्यास.
६. कुटुंबातील सदस्य राज्य किंवा केंद्र सरकारच्या उपक्रमांचे संचालक/सदस्य असल्यास.
७. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नोंदणीकृत असल्यास.
आवश्यक कागदपत्रे (Documents Required for Application):
- आधार कार्ड
- बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असणे आवश्यक)
- लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो
- अधिवास प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास आवश्यकता नाही, शुभ्र शिधापत्रिका असल्यास आवश्यक)
- नवविवाहित महिलांसाठी विवाह प्रमाणपत्र
How to Apply Through Majhi Ladki Bahin Yojana Official Website Portal -
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:(For New Registration Process)
१. "Majhi Ladki Bahin Yojana" च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
२. होम पेजवर अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
३. लॉगिन पेज उघडल्यावर, नवीन USER ID आणि PASSWORD तयार करा.
४. "Create Account" पर्यायावर क्लिक करा आणि Sign Up फॉर्म भरा.
५. व्यक्तिगत अर्जदार म्हणून "General Woman" पर्याय निवडा.
६. Captcha भरा आणि Sign Up करा.
७. मोबाईलवर आलेला OTP व्हेरिफाय करा.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
१. लॉगिन पेजवर USER ID आणि PASSWORD वापरून लॉगिन करा.
२. "Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana" वर क्लिक करा.
३. आधार क्रमांक टाकून व्हेरिफाय करा.
४. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. (अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.)
५. सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा.
अशाप्रकारे, तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Link
महत्त्वाची सूचना (ऑफलाइन प्रक्रियेबाबत) :
ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
FAQ - Frequently Asked Questions :
लाडकी बहीण योजनेची पात्रता ?
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे व त्याप्रमाणे महिलेचे वय 21 ते 65 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ?
महाराष्ट्र लाडली बहना योजना 2024 अंतर्गत आर्थिक सहाय्य काय आहे?
- महाराष्ट्र लाडली बहना योजना 2024 अंतर्गत आर्थिक मदत 1500 रुपये आहे.
No comments:
Post a Comment